जालन्यात गारपिटीमुळे पिकांना फटका; भोकरदन, घनसावंगी तालुक्यात गारपीट

Foto
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात गारपिटीसह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली. तर मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. 
२० व २१ तारखेला जालना औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अन्य भागात ढगाळ  वातावरण राहून काही ठिकाणी गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला होता. भोकरदन तालुक्यातील पारध व रेणुकाई पिंपळगाव येथे काल रात्रीच्या सुमारास गार पडल्या यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. गारपिटीमुळे, गहू, हरभरा, व मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. २१ व २२ तारखेला देखील ढगाळ वातावरण राहून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker